केना

स्थानिक नाव : Commelina benghalensis
कुळ : कॉमिलीनिएसी
उपयुक्त भाग : पाने
कालावधी : वार्षिक

औषधी गुणधर्म

  • या भाजीमुळे पचनक्रिया होऊन पोट साफ होते.
  • त्वचाविकार, सूज इ. विकार कमी होतात.
  • भाजीमुळे लघवी साफ होण्यास मदत होते.

केनाचे वडे

साहित्य
केना, तांदळाचे पिठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर

कृती
• एका पातेल्यात कापलेली केना भाजी घेऊन त्यात तांदळाचे पिठ, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर टाकुन व आवश्यकतेनुसार पाणी टाकुन मळुन घ्यावे.
• नंतर एक कढई घेउन त्यात तेल गरम करुन त्यात वरील मिश्रणाचे वडे बनवुन लालसर होईपर्यंततळून घ्यावे.
• अशा प्रकारे आपल्या आवडीची वडे तयार होतील.

केनाचे थालीपिठ

साहित्य

केना, तांदळाचे पिठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर, ओवा, तीळ.

कृती
• एका पातेल्यात कापलेली केना भाजी घेऊन त्यात तांदळाचे पिठ, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर, ओवा, तीळ टाकुन व आवश्यकतेनुसार पाणी टाकुन पातळ मिश्रण करावे.
• नंतर गॅसवर तवा गरम करुन त्यावर एक चमचा तेल टाकुन त्यावर वरील मिश्रण टाकुन वर्तुळाकृती पसरवावे व त्याला झाकुन घ्यावे.
• काही वेळानंतर झाकणी काढुन त्याला पलटवुन पुन्हा एक चमच तेल टाकुन शिजवावे.
• अशा प्रकारे आपल्या आवडीची केनाचे थालीपीठ तयार होतील.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *