कर्टोली…

शास्त्रीय नाव : Momordica dioica
कुळ : Cucurbitaceace
स्थानिक नाव : काटोली, कटुर्ल, रानकारली, काटवल, कर्कोटकी इ.

कर्टोलीची भाजी


साहित्य :

हिरवी कोवळी कर्टोली, आले खोबरे अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, हिंग,
मोहरी, मीठ, जिरे, हळद, दोन चिरलेल्या मिरच्या, लाल तिखट, साखर तेल इत्यादी.

कृती :

 • कर्टोल्यांचे अर्धे भाग करुन त्यातील बिया व गर काढून टाकावा.
 • नंतर बटाट्याचे काप केल्याप्रमाणे करटुली चिरुन घ्यावीत.
 • पॅनमध्ये तेल गरम करुन हिंग, मोहरी व थोडेसे जिरे टाकून फोडणी घालावी.
 • त्यात चिरुन घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकाव्यात.
 • नंतर त्यात कांदा, मीठ, थोडेसे लाल तिखट व हळद घालुन चांगले परतावे.
 • चिरलेली कर्टोली त्यात घालुन पुन्हा परतावीत. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी.
 • नंतर झाकण काढून मंद गॅसवर पाणी न घालता ३ ते ४ मिनिटे भाजी परतावी व नंतर वरुन ओले खोबरे व थोडी साखर घालावी

औषधी गुणधर्म :

 • डोकेदुखीत पानांचा अंगरस, मिरी, रक्तचंदन आणि व नारळाचा रस एकत्र करुन चोळतात.
 • मुतखडा, सर्व प्रकारची विषबाधा, हत्तीरोग या विकारांत कंदाचा वापर करतात.
 • करटोलीची पाने ताप, दमा, दाह, उचकी, मुळव्याध यात गुणकारी आहेत.
 • भाजी रुचकर असुन पोट साफ़ होण्यासाठी उपयुक्त आहे.
 • मधुमेहामध्ये या भाजीचे नियमीत सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.
 • मुळव्याध मधील वरचेवर रक्तस्राव वेदना ठणका यामध्ये भाजी अत्यंत हीतकारक आहे.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: