आंबुशी

शास्त्रीय नाव : Oxalis Corniculata
स्थानिक नाव : आंबुटी, आंबाती, आंबटी, भुईसर्पटी इ.
कुळ : Oxalidaceae
इंग्रजी नाव : Indian Sorrel
आढळ : आंबुशी हे प्रामुख्याने बागेत जागी तसेच कुडयातून वाढणारे तण आहे. ही भाजी महाराष्ट्रात सर्वत्र आढळते.

औषधी गुणधर्म

  • आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे, पचनास हलकी असून चांगली भूकवर्धक आहे.
  • आंबुशीच्या अंगरसाने धमन्यांचे संकोचन होऊन रक्तस्त्राव बंद होतो.
  • चामखीळ आणि नेत्रपटलाच्या अपारदर्शकतेत पानांचा रस बाहय उपाय म्हणून वापरतात.
  • आंबुशी वाटून सुजेवर बांधल्यास दाह कमी होऊन सूज उतरते.
  • धोतऱ्याचे विष चढल्यास आंबुशीचा रस उतार म्हणून देतात.
  • कफ, वात यात आंबुशी गुणकारी आहे.

अंबुशीची भाजी

साहित्य
आंबुशीची पाने, तुरडाळ (किंवा मुग, मसुरडाळ), दाणेकुट, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, तेल, डाळीचे पीठ, लसुण पाकळ्या, मोहरी, हिंग, हळद, गुळ इ.

कृती

  • तेलाच्या फोडणीत लसून परतुन घेणे
  • आंबुशची भाजी व डाळ कुकुरमध्ये शिजवून, घोटून त्यात डाळीचे पीठ लावावे.
  • फोडणीत भाजी घालावी. वाटलेली मिरची पेस्ट, मीठ, दाणेकुट व गुळ घालुन शिजवावी.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *