पुणे : श्रावण महोत्सव या आंतरराष्ट्रीय पाककला स्पर्धेत पनवेलच्या प्रणाली पोतदार-मोरवाडकर यांच्या ‘स्प्राऊट्स कोफ्ते इन स्पिनीच ग्रेरी’ या रेसिपीला दुसऱ्या क्रमांकाचे पारिताेषिक मिळाले. परिक्षकांच्या हॉटेलमध्ये ही डिश यापुढे प्रणाली पोतदार यांच्या नावाने उपलब्ध होणार आहे.

उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशन्सतर्फे दरवर्षी श्रावण महोत्सव ही पाककला घेतली जाते. स्पर्धेचे यंदाचे हे पाचवे वर्ष असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. स्पधेचा महाअंतिम सोहळा रविवारी (ता.१६) फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून घेण्यात आला.

स्पर्धेमध्ये जगभरातुन दीड हजार रेसिपीज सादर झाल्या. स्पधेचे परिक्षण संगीता कोरडे (अमेरिका), मनोज वसईकर (लंडन), सचिन जोशी (दुबई), जयंती कठाले (भारत) या नामांकीत शेफनी केले.

प्रणाली पोतदार या पनवेल येथील सुप्रसिध्द प्रणाल गुपचे कार्यकारी संचालक मनोज पोतदार यांच्या सुनबाई व पुणे येथून जलसंधारण विभागातुन, सहाय्यक अधीक्षक अभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले श्री. रामचंद्र मोरवाडकर यांच्या कन्या आहेत. प्रणाली पोतदार यांनी या यशाचे श्रेय त्यांच्या सासुबाई सुषमा पोतदार यांना असल्याचे सांगितले.

आंतरराष्ट्रीय पाककला स्पर्धेत प्रणाली पोतदार-मोरवाडकर यांचे यश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: