स्तनदा माता, बालकांच्या आहारात भुकटीचा समावेश

मुंबई : टाळेबंदीच्या काळात सुरू करण्यात आलेली अतिरिक्त दूधाचे भुकटीत रुपांतर करण्याची योजना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याकरिता राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार या योजनेंतर्गत प्रतिदिन प्रतिविद्यार्थी १८ ग्रॅम याप्रमाणे ६ लाख ५१ हजार मुलांना आणि प्रतिदिन प्रतिमहिला २५ ग्रॅम याप्रमाणे १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना १ वर्षाकरीता उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला.

संपूर्ण जगभरात कोविड-१९ या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २३ मार्चपासून टाळेबंदी घोषित करण्यात आला होता. या टाळेबंदीमुळे राज्यात निर्माण होणाऱ्या दूधाच्या मागणीत प्रचंड घट झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दूधाची परिस्थिती निर्माण होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधासाठी कमी दर प्राप्त होऊ लागला.

या अतिरिक्त दूधाच्या परिस्थितीत सूधारणा होऊन दुग्धव्यवसायात समतोल राखता यावा यासाठी शासनाने हस्तक्षेप करुन प्रतिदिन १० लाख लीटर मर्यादेपर्यंत दूध स्विकृत करुन सदर दूधाचे रुपांतरण करण्याची योजना घोषित केली. ६ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत ही योजना राबविण्यात आली. या योजनेद्वारे सुमारे सहा लाख लीटर घेऊन ४४२१ टन दूध भुकटी २३२० टन इतके देशी कुकींग बटर उत्पादन करण्यात आले. राज्यातील दुग्धव्यवसायात अद्यापही स्थिरता आलेली नसल्याने आज सदर योजना ३१ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी शासनामार्फत १९८.३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: