कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय

पुणे : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा परिषदेकडून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यासह अन्य ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले. प्रत्येक रूग्णाला तात्काळ उपचार मिळावे, आरोग्य यंत्रणेला मनुष्यबळाची कमतरता भासू नये. यासाठी जिल्हा परिषदेकडून कंत्राटी तत्वावर १३५ परिचारिका आणि १७४ आरोग्य सेविकांची पदे भरण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

कंत्राटी पध्दतीने भरण्यात आलेली पदे तीन महिन्यांसाठी असून, आवश्‍यकता भासल्यास ही मुदत वाढविण्यात येईल. अन्यथा आपोआप हे कंत्राट रद्द होईल. आदेश प्राप्त होताच कर्मचाऱ्यांनी केंद्रावर हजर व्हावे. सात दिवसांच्या आत हजर राहिले नाही तर केलेली नियुक्ती रद्द होईल. उमेदवारी अर्ज भरताना अर्जामध्ये लिहिलेली माहिती किंवा त्यासोबत जोडलेले कागदपत्र चुकीचे असल्यास नेमणुक रद्द होईल. या कर्मचाऱ्यांना कार्यालयाकडून कोणतीही सवलत, प्रवासखर्च आणि वाहनसुविधा मिळणार नाही. एखाद्या कर्मचाऱ्याला राजीनामा द्यायचा असेल तर त्याने एक महिना अधी नोटीस देणे बंधनकारक आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना भविष्यात नियमित नियुक्ती करण्याबाबत मागणी करता येणार नाही, असे या आदेशामध्ये म्हटले आहे.

तालुकानिहाय परिचारिका आणि आरोग्य सेविका यांची नेमणूक
परिचारिका : मुळशी ६९, आंबेगाव ७, बारामती १०, भोर २, दौंड १०, जुन्नर ३, खेड ७, मावळ ८, पुरंदर ९, शिरूर ८, वेल्हा २.
आरोग्य सेविका : शिरूर १४, आंबेगाव २८, बारामती ११, भोर ८, दौंड १०, हवेली ९, जुन्नर १३, इंदापूर १०, खेड १४, मुळशी ६, मावळ १२, पुरंदर ११ आणि वेल्हा ९, हिंजवडी कोवीड केअर सेंटर २४.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: