Mahavrutta.in

  • Full Screen
  • Wide Screen
  • Narrow Screen
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size

महावृत्त

उत्तर काश्‍मीरमध्ये हिमकडा कोसळून ११ जवानांचा मृत्यू

श्रीनगर - उत्तर काश्‍मीरमध्ये हिमकडा कोसळून ११ जवानांना आपले प्राण गमवावे लागले असून आणखी काही जवान हिमकड्याखाली दबले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अपघात बंदीपूरा आणि सोनमर्ग परिसरात घडला.
पुढे वाचा...

पेशावरमधील बॉंबस्फोटात १२ ठार

पेशावर - येथे आज सकाळी झालेल्या बॉंबस्फोटात १२ जण ठार झाले असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट पेशावर शहरातील एका बस थांब्यावर झाला. सकाळची वेळ असल्याने तेथे अनेक प्रवासी बसची बाट पाहात उभे होते. जखमींवर येथील जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटात अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या बॉंबस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

भारतीय मजदूर संघाचा २८ ला देशव्यापी संप

पुणे - खासगीकरण, कंत्राटीकरण, आऊटसोर्सिंग पूर्णपणे बंद करण्यात यावे, सर्व कामगार कायद्याचे काटेकोर पालन करण्यात यावे या आणि यांसारख्या विविध मागण्यांसाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी भारतीय मजदूर संघातर्फे देशव्यापी संप पुकारण्यात येणार आहे, असा इशारा भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उदयराव पटवर्धन आणि महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष प्रभाकर बाणासुरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
पुढे वाचा...

कुराणच्या अवमानावरून अफगाणमध्ये संघर्ष

बगदाद - अमेरिकेच्या येथील सैन्य तळावर सफाई मजदुरांना आढळलेल्या कुराणच्या जळालेल्या प्रतीवरून अफगाणमध्ये संघर्ष उफाळला आहे. हाजी शिरीन यांच्या नेतृत्वाखाली अफगाणी नागरिकांनी अमेरिकन सैन्य तळापुढे जोरदार निदर्शने करत निषेध नोंदवला. यावेळी काहींनी दगडफेकही केली. त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी अमेरिकन सैन्याने सौम्यप्रमाणात सैन्यबलाचा वापर करून गर्दीवर नियंत्रण आणले.
पुढे वाचा...

पान 1 च्या 545

You are here: