आमच्या विषयी

“महावृत्त डॉट कॉम” या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. जगभरातील विविध घडामोडींची माहिती आपल्यापर्यंत पोचविण्यासाठी “महावृत्त” हे न्यूज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. “महावृत्त”च्या माध्यमातून कृषी, हवामान, ग्रामविकास यांचबरोबर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, मनोरंजन, कला, क्रीडा या विषयीची माहिती आपल्यापर्यंत पोचविण्यात येते.

‘शेतकरी प्रथम’ या तत्त्वानुसार कृषी क्षेत्राशी निगडीत आत्याधुनिक तंत्रज्ञान, पुरक व्यवसाय, कृषी प्रक्रिया, बाजारभाव, प्रयोगशील, प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यशकथा, ग्रामविकास, राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय आदी घडामोडी सातत्याने आपल्यापर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे आवर्षण, अतिवृष्टी, अवेळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळे, उष्णता, थंडीच्या लाटा, यामुळे शेती व शेतकऱ्यांच्या समोर संकटे उभी राहत आहेत. यातच कीड-रोगांमुळेही नुकसानीत वाढच होत आहे. हवामान बदलाविषयी शेतकऱ्यांना योग्य वेळी सतर्क करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, आवश्यक ते मार्गदर्शन करणे, तसेच राज्य, केंद्र सरकार, कृषी विभाग, कृषी विद्यापीठे यांच्या सहकार्याने कृषी विस्ताराच्या कामाला हातभार लावण्याच्या व शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता आणण्याच्या उद्देशाने “महावृत्त”ची वाटचाल सुरू आहे.

समाज माध्यमे

ईमेल : newsmahavrutta@gmail.com
फेसबुक : https://www.facebook.com/newsmahavrutta
ट्वीटर : https://twitter.com/mahavrutta1
इंन्स्टाग्राम : https://www.instagram.com/mahavrutta
यूट्यूयुब : https://www.youtube.com/channel/UCGiBkiNEHyEEmY7RLJqMkXA