भोर : केंद्र सरकारने वाढविलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात भोर तालुका शिवसेनेच्या वतीने भोर तहसीलदार अजित पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले. दरवाढ कमी न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, माजी उपसभापती अमोल पांगारे, युवासेनेचे उपजिल्हाधिकारी आदित्य बोरगे, भोर शहरप्रमुख नितीन सोनावले, विभागप्रमुख ज्ञानेश्वर मांढरे, उपविभागप्रमुख पपू राजीवडे, सचिन जेधे आदी उपस्थित होते.

केंद्रीय अर्थ संकल्पानंतर राज्यात महागाईचा भडका उडाला असून, घरगुती वापराच्या गेस सिलेंडरचे दर २५ रुपयांनी वाढले. एकाच महिन्यात जवळपास अकरावेळा पेट्रोल डीझेलची दरवाढ केली. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना आणि शेतकरी वर्गाला प्रामुख्याने बसणार आहे. केंद्र सरकारने गस सिलेंडर, पेट्रोल डिझेलचे दर कमी कमी करावी तसेच तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *