भोर (माणिक पवार) : भोर तालुका पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सभापती पदाचा राजीनामा दिल्याने ठरल्याप्रमाणे प्रशासकीय अनुभव असलेले माजी उपसभापती लहु शेलार हे सभापती पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असून गेल्या वर्षी लहु शेलार, श्रीधर किंद्रे व दमयंती जाधव हे तिघे जण सभापतिपदाच्या शर्यतीत होते. मात्र पक्षाच्या आदेशानुसार एका वर्षासाठी किंद्रे यांची सभापती पदासाठी वर्णी लागली होती. तसेच सभापती पदाच्या निवडीवेळी देखील पक्षाध्यक्ष आदेशाचे पालन करत शेलार यांनी दोन पाऊले मागे घेतले. तसेच सव्वा वर्षाच्या ठरलेल्या मुदतीत उपसभापती पदाचा राजीनामा देखील दिला होता. तर दुसऱ्या वर्षासाठी शेलार यांची निवड करण्याचे ठरल्याचे दावा त्यांनी केला आहे. अशा दोन्हीही वेळा पक्षाच्या आदेशाचे पालन करणाऱ्या शेलार हे सभापती पदाचे दावेदार मानले जात आहे.

दरम्यान, भोर पंचायत समितीमध्ये एकूण ६ सदस्य असून राष्ट्रवादी ४, काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल असून सर्वसाधारण प्रवर्गातून सदस्य लहु शेलार यांनी यापूर्वी हातवे बु. ग्रामपंचायत सरपंच आणि पंचायत समितीवर उपसभापती म्हणून आपल्या विकासकामांची छाप पाडली आहे. सभापती पदासाठी सर्वसाधारण पुरुष आरक्षण असल्याने नसरापूर आणि भोंगवली हे दोनच अधिकृत सर्वसाधारण गण असून २०१७ च्या निवडणुकीत नसरापूर गणातून राष्ट्रवादीचे लहुनाना शेलार आणि भोंगवली गणातून कॉग्रेसचे रोहन बाठे निवडून आले आहेत. पंचायत समितीवर राष्ट्रवादीची बलाबल जादा असल्याने लहुनाना शेलार यांना सभापती पद मिळण्याचा मार्ग मोकळा असल्याचे राजकीय वर्तुळातून चर्चा होत आहे. शेलार यांची निवड झाल्यास नसरापूर – भोलावडे गटावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो.

शेलार यांना पक्ष न्याय देणार ?

सरपंच पदापासून कारकीर्द करणाऱ्या लहुनाना शेलार यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष संघटन उभे केले. या जोरावर नसरापूर – भोलावडे जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार म्हणून त्यांचे नाव प्रचलित राहिले होते. गतवर्षी सभापती पदाची हुलकावणी मिळालेल्या शेलार यांना पक्षाकडून सभापती पद देऊन न्याय देणार का? याकडे लक्ष जनतेचे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *