सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी शासनाकडून ७२ लाखांचा निधी

पुणे : स्वच्छता अभियानअंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार जिल्ह्यात ६७२ सार्वजनिक शौचालयाचे युनिटची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी जिल्ह्यात ४० शौचालय युनिट उभारणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून मंजूरी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील बाजार गावे, तिर्थक्षत्रे गावे, पालखी गावांना, लोकवर्दळ व पर्यटन स्थळ असलेल्या गावांमध्ये स्वच्छता रहावी यासाठी सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार मंजूर करण्यात येतात. त्यानुसार आंबेगाव, भोर, इंदापूर, हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, वेल्हा तालुक्यात हे चाळीस युनिट बांधण्यात येणार आहेत. बांधकामासाठी केंद्राकडून ६० तर राज्याकडून ३० टक्के आणि लाभार्थ्याकडून १० टक्के हिस्सा दिला जाणार आहे. प्रती युनिट दोन लाख प्रमाणे ८० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, केंद्र आणि राज्याकडून ७२ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत.

असे असेल सार्वजनिक शौचालय

सार्वजनिक शौचालयाचे एका युनिटमध्ये महिलांसाठी दोन युरिनल, दोन शौचालय, एक वॉश बेसीन तसेच पुरुषांसाठी दोन युरिनल, तीन शौचालय, एक वॉश बेसीन असणार आहे. एक हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी, चार शोषखड्डे असे एक युनिट असून त्यासाठी दोन लाख रुपये देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!