पुणे : ॲग्रो टुरिझम विश्वच्या नवीन लोगोचे अनावरण खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते अनावरण नुकतेच करण्यात आले. शेतकरी, शेती, ग्रामीण पर्यटन केंद्र चालक आणि पर्यटकांसाठी ॲग्रो टुरिझम विश्व करत असलेल्या कामाचेही डॉ. कोल्हे यांनी कौतुक केले.

ॲग्रो टुरिझम विश्वचे संस्थापक गणेश चप्पलवार, व्यवस्थापकीय संचालक मनिषा उगले, प्रकल्प प्रमुख वैभव खेडकर आणि दिलीप चप्पलवार उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, बदल ही काळाची गरज आहे. ॲग्रो टुरिझम विश्वच्या नवीन लोगो अर्थपूर्ण आहे. त्यात आभाळ, पक्षी, डोंगर, शेती, पीक, नांगरणी करताना शेतकरी, झाडं, शेतातील घर, छोटे पर्यटक, अशा विविध ग्रामीण भागाचे प्रतिबिंब या लोगोच्या माध्यमातुन दिसुन येते. कृषी पर्यटनाच्या माध्यमातुन शहरी भागातील लोकांना ग्रामीण भागातील संस्कृतीची ओळख करुन देणे हा उद्देश आहे. शेतकरी कशा पध्दतीने शेतात कष्ट करुन पिके पिकवितो याची जाण करुन देण्याचा प्रयत्न ॲग्रो टुरिझम विश्वने केला आहे. असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

ॲग्रो टुरिझम विश्वने कृषी पर्यटनाला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. तसेच सुरु असलेल्या इतर कार्याची माहितीही गणेश चप्पलवार यांनी खासदार डॉ. कोल्हे यांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!