राजेश डवरे

मिरची या पिकावर सर्वात जास्त नुकसान करणारी कीड म्हणून फुलकिडीचा उल्लेख केला जातो. मिरचीवरील फुलकिडे फिक्कट पिवळ्या किंवा करड्या रंगाचे असून ते पाने खरडतात व त्यातून स्त्रवणारा रस शोषण करतात त्यामुळे मिरचीची पाने वरच्या बाजूने द्रोणासारखी आकसली जातात. झाडाची शेंडे चुरडलेल्या सारखी दिसतात. मिरचीवरील फुलकिडीसाठी आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन गरजेनुसार खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकता.

फिप्रोनील ५ % एस. सी. (Fipronil 5 % S.C.) २० मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
सायनाटनीप्रोल १०.२६ ओ. डी. (Cynantaniprole 10.26 O.D.) १२ मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
लॅम्बडा सायलोहाथ्रीन ५ ई.सी. (Lambda Cylohathrine 5 E.C.) ५ ते ६ मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
इमाबॅक्टिन बेंझोएट ५ एस. जी. (Emabectin benzoate 5 S.G.) ४ ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी
किंवा
स्पिनोसॅड ४५ एस सी (Spinosad 45 S.C.) ३ मिली अधिक दहा लिटर पाणी

या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन व योग्य निदान करून फवारणी करावी.

टीप

  • फवारणी करताना लेबल क्लेम शिफारशीची शहनिशा करून लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणेच फवारणी करावी.
  • फवारणी करताना अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी करणे टाळावे.
  • रसायनाची फवारणी करताना सुरक्षा कीट चा वापर करावा तसेच सुरक्षित कीडनाशक फवारणी तंत्राचा वापर करावा.

लेखक : राजेश डवरे हे कृषी विज्ञान केंद्र, करडा, जि. वाशिम येथे कीटकशास्त्रज्ञ आहेत. मो. ९४२३१३३७३८.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *