वाघाटी

शास्त्रीय नाव : Capparis zeylanica
वाघाटीच्या वेली सर्वत्र आढळतात. काटे टोकदार, वाकडे, चपटे, कठीण, जोडीने असतात.
काटे वाघाच्या नखांसारखे असल्यानेच या वनस्पतीला वाघाटी, व्याघ्रनखी तसेच गोविंदी, गोविंदफळ या नावाने ओळखतात.
फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात फुले येतात.
वाघाटीच्या कोवळ्या फळांची भाजी करतात. 
वाघाटीचे मूळ, फळ व फळाचा गर औषधात वापरतात.

औषधी गुणधर्म

  • वाघाटी उष्ण उत्तेजक, श्लेष्मघ्न, मूत्रजनन, शोथघ्न आणि कफघ्न आहे.
  • वाघाटी पित्तशामक व वातहारक आहे.
  • सुतिका ज्वरात वाघाटीचा काढा देतात.
  • उष्णतेमुळे अंगावर गळवे उठतात त्यावर वाघाटीचे मूळ पाण्यात उगाळून लेप करतात.
  • नाडीव्रण व भगंदरात वाघाटीच्या तेलात वात भिजवून घालतात. त्यामुळे व्रण रुजून येतो. 
  • वाघाटीचे मूळ पाण्यात उगाळून समभाग तिळाच्या तेलात उकडतात व त्यापासून वाघाटीचे तेल बनवितात.
  • वाघाटी क्षयरोगावर अप्रतिम औषध आहे. 
  • मुलांच्या लाल स्रावावर वाघाटीचे मूळ उगाळून पाजतात.
  • वाघाटीचे फळ कफ, वायू व त्रिदोष यांचा नाश करते.
  • गजकर्ण, इसबगोल, सोरायसिसमुळे हातापायाला पडलेल्या भेगा यावर वाघाटीच्या पानांचा चुरून लेप ७ दिवस लावल्यास गुणकारी ठरतो.
  • धातू पुष्ट होण्यास ही भाजी उपयोगी पडते.
  • थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात बिघाड झाल्याने उत्पन्न होणाऱ्या लक्षणात वाघाटी भाजीच्या सेवनाने फायदा होतो.

वाघाटीची भाजी

साहित्य

वाघाटीची कोवळी फळे, कांदा, जिरे, लसूण, हिंग,हळद, तेल इ.

कृती

  • फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत. 
  • फळे बारीक चिरून घ्यावीत. बिया काढून टाकाव्यात. 
  • चिरलेली फळे पाण्यात चांगली शिजवावीत. * गार झाल्यानंतर चिरलेली भाजी पिळून घ्यावी. 
  • कढईत तेल घालून नंतर त्यात कांदा, लसूण घालून ते चांगले परतून घ्यावे.
  • त्यामध्ये पिळून घेतलेली भाजी घालून जिरे, हिंग व हळद घालून भाजी चांगली वाफवावी.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन, विकीपेडिया व निसर्गशाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *