शिंदड माकडं / माकड शिंग

शास्त्रीय नाव : कार्लुमा फिंब्रिआटा (Caralluma Fimbriata)
कुळ : अ‍ॅपोकेनेसी (Apocynaceae)
इंग्रजी नावे : एडीबल कॅक्टस, कारालुमा (Edible cactus, Caralluma)

औषधी गुणधर्म

  • शिंदड माकड मणक्याच्या विकारावर उपयुक्त आहे.
  • वात नाशक, लठ्ठपणा कमी करण्यासाठी लाभदायक आहे.
  • मधुमेहासाठी अनिशा पोटी रोज एक तुकडा खाल्ल्यास साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

शिंदड माकडाची भाजी

साहित्य
शिंदड माकड, कांदा, लसून, हिरवी मिरची, मीठ, जिरे, हिंग आणि तेल.

कृती

  • शिंदड माकडाचे तुकडे करून मिक्सर मधुर जाडसर काढावे.
  • पाण्यात पाच तास भिजत ठेवावे.
  • त्यानंतर चाळणीतून गळून घ्यावे.
  • कढईत तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्यावा.
  • मिरची, मीठ, हिंग, जिरे घालावे.
  • शिंदड माकड पिळून घ्यावे आणि त्यात घालावे.
  • पाच सहा मिनिट वाफ दिल्यानंतर भाजी तयार होईल.

सौजन्य : अनिता दुरगुडे, गृहिणी, राहरी, जि. नगर. (मो.९६५७६१४०६४)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *