कवठ

शास्त्रीय नाव :- Limonia acidssima
कुळ : Rutaceae

औषधी गुणधर्म

  • कवठ स्तंभक (आकुंचन करणारा), उत्तेजक, भूक वाढविणारा आहे.
  • अतिसार, आमांश इ. पोटाच्या तक्रारींवर चांगला विषारी कीटकदंशावर बाहेरून लावतात.
  • बियांतील तेल खाजेवर लावतात. साल पित्तावर उपयुक्त आहे.
  • पाने सुवासिक, वायुनाशी व अंगावर पित्त उठल्यास त्यांचा रस लावतात.

कवठाची चटणी

साहित्य
कच्चे कवठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, लसुण, जिरा, तिखट, मीठ, हळद, तीळ

कृती

  • कच्चे कवठ घेऊन त्याचा गर चमच्याने काढून घ्यावा.
  • गराचा बारीक लगदा करुन घ्यावा.
  • नंतर एक पातेले घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल, गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, लसुण, जिरा, तिखट, मिठ, हळद, व तीळ टाकून परतुन घ्यावे.
  • नंतर त्यामध्ये कवठाचा गर टाकून शिजु द्यावे.
  • अशा प्रकारे आपल्या आवडीची कवठाची चटणी तयार होईल.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, मराठी विश्वकोश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!