कमळकाकडी

शास्त्रीय नाव – निलुम्बो न्युसिफेरा (Nelumbo nucifera)
कुळ – निलूम्बोनेसी (Nelumbonaceae)
स्थानिक नावे – पद्मकमळ, सूर्यकमळ, लक्ष्मीकमळ
इंग्रजी नावे – इंडियन सॅक्रेड लोटस, चायनीज वॉटर लिली (Indian Sacred Lotus, Chinese water lilies)
कमळ ही वनस्पती उष्ण प्रदेशात भारतात सर्वत्र तलाव-तळ्यात वाढते. कमळाच्या बियांना संस्कृतमध्ये “पद्मबीज’ म्हणतात. बिया असणाऱ्या फुलांच्या फुगीर भागास मराठीत कमळकाकडी म्हणतात. कमळाच्या कंदास कमळकंद म्हणतात. फुलाचा मधला भाग (म्हणजेच पुष्पस्थली) गोलाकार, त्रिकोणी, नरसाळ्यासारखा सुमारे १५ ते १८ सें.मी. उंच. या भागास “कमळकाकडी’ म्हणतात.

औषधी गुणधर्म

  • कमळकाकडी (पुष्पस्थली) पौष्टिक, स्नेहन, ग्राही व रक्तसंग्राहक आहे.
  • कमळकाकडीच्या पेजेने उलटी व उचकी बंद होते. प्रदरांत कमळकाकडीची पेज देतात.
  • अत्यंत थंड व पौष्टिक असल्याने शरीरातील ताकद वाढविण्यासाठी कमळकाकडी भाजी अत्यंत उपयुक्त मानतात.
  • या भाजीमुळे रक्तातील उष्णता कमी होते. या भाजीने बाळंतीणीचे दूध वाढते.
  • कमळकाकडीच्या भाजीने पित्तामुळे होणारा त्रास, लघवीची जळजळ इ. लक्षणे कमी होतात.
  • ताप येऊन गेल्यानंतर उष्णतेचा परिणाम कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे.
  • कमळकाकडीची भाजी काश्‍मीर व गुजरातमध्ये अगदी आवर्जून खातात, तर सिंधी खाद्यसंस्कृतीत या भाजीला विशेष महत्त्व आहे.

कमळकाकडीची भाजी

साहित्य

कमळकाकडी, मटार दाणे, कांदा, लसूण, हळद, टोमॅटो, खोबरे, गरम मसाला, आले, कोथिंबीर, लाल मिरच्या, पुदिना, धने, मीठ इ.

कृती

  • कमळकाकडी चांगली सोलून घ्यावी.
  • कुकरमध्ये कमळकाकडीच्या फोडी आणि मटार दाणे उकडून घ्यावेत.
  • कमळकाकडी फार मऊ होऊ नये, यासाठी शिजवताना पाण्यात अर्धा चमचा मीठ घालावे.
  • कांदा, खोबरे, धने, मिरच्या, खडा मसाला असल्यास तव्यावर तेल टाकून भाजून घ्यावा.
  • तेल गरम करून त्यावर वाढलेला मसाला, हळद घालून सुगंध येईपर्यंत परतावे.
  • मग त्यात शिजवलेली कमळकाकडी व मटार दाणे व चिरलेला टोमॅटो घालावा, नंतर चांगले परतून घ्यावे.
  • कमळकाकडी शिजवून राहिलेले पाणी न फेकता भाजीत घालावे. नंतर मीठ व कोथिंबीर टाकून पाच मिनिटे मंद आचेवर शिजवावे.

सौजन्य : विकासपिडीया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *