गुळवेल

शास्त्रीय नाव : Tinospora cordifolia
स्थानिक नावे : गरुडवेल, अमृतवेल, अमृतवल्ली इ.
इंग्रजी नाव : Heart Leaved Munseed
कुळ : Menispermacea
आढळ : ही बहुवर्षायु वेल महाराष्ट्रात सर्वत्र आढळते.

औषधी गुणधर्म

  • गुळवेल महत्वाची औषधी वनस्पती असून तिची खोडे अनेक रोगांवरील औषधात वापरतात. वनस्पतीची पानेही औषधी आहेत.
  • नेत्र विकार, वमन विकार, सर्दी पडसे, संग्रहणी, पांडुरोग, प्रमेह, मूत्रविकार, यकृत विकार, ज्वर, कॅन्सर, त्रिदोष विकार, त्वचा रोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तशर्करा विकार आदी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे.
  • गुळवेल कटुपौष्टिक, पित्तसारक, संग्राहक, मूत्रजनन, ज्वरहर व नियतकालिक ज्वरनाशक गुणधर्माची आहे.
  • ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे.
  • गुळवेलीचे सत्व व काढा वापरतात. ती रक्तसुधारक असून पित्तवृध्दीच्या काविळीत गुणकारी त्वचारोगात उपयोगी आहे.
  • मधुमेह, वारंवार मुत्रवेग, कुष्ठ व वातरक्त विकारातही उपयुक्त आहे.
  • गुळवेलीमध्ये टिनोस्पोरिन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरिन गिलोइन, गिलोनिन ही रासायनिक गुणद्रव्ये आहेत.
  • ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानांत आला आहे.

गुळवेलाचा काढा

साहित्य
गुळवेलाची भरड किंवा कांड

कृती

  • गुळवेलाची भरड किंवा कांड आणून ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यावे.
  • काढा करण्यासाठी १ कप गुळवेल घेतल्यास त्याच्या १६ पट पाणी घालावे.
  • हे मिश्रण १/४ होईपर्यंत उकळून घ्यावे.
  • हा काढा चवीला कडसर लागतो. पण अत्यंत गुणकारी आहे.
  • मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी केली जाते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *