चंदनबटवा

शास्त्रीय नाव : ॲट्रिप्लेक्स हॉर्टेन्सिस
इंग्रजी नाव : मौंटन स्पिनॅक
पाने साधी, एकाआड एक असून खालची किंचित त्रिकोणी, तर शेंडयाकडची लांबट असतात. पाने रंगाने हिरवी, पिवळसर, केशरी, जांभळी किंवा लालसर जांभळी असतात.

औषधी गुणधर्म

 • बध्दकोष्ठ, पोटामध्ये ग्यासेस, अपचन या समस्याकरिता गुणकारी.
 • या भाजीमध्ये अ जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फेट आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आहेत.
 • या पालेभाजीच्या सेवनाने किडनी स्टोन होण्याचा धोका टाळता येवू शकते.
 • सांधेदुखी किंवा स्नायू वेदना दूर होण्यास मदत होते.

चंदन बटव्याचं धिरडं

साहित्य

चिरलेली चंदन बटव्याची पानं, कणिक, रवा, दही, चिंचेचा कोळ, ठेचलेल्या मिरच्या, लसूण, हळद, ओवा, काळे/पांढरे तीळ, मीठ, तेल तूप भाजण्यासाठी.

कृती

 • चंदन बटव्याची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्यावी.
 • एका वाडग्यात चिरलेली पानं आणि सगळे साहित्य घाला. (तेल/तूप वगळून) आणि एकत्र करा.
 • जरुर पडल्यास पाणी घालून इडलीच्या पिठासारखं भिजवून घ्या.
 • गरम तव्यावर पाणी शिंपडून २ चमचे पीठ घाला.
 • हाताला थोडे पाणी लावून पीठ तव्यावर एकसारखं पसरा.
 • झाकण ठेवून २-३ मिनिटे भाजा.
 • नंतर थोडे तेल/तूप घाला व धिरडं परता. दुसरी बाजूही भाजून घ्या.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, मराठी विश्वकोश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!