अंबाडी

शास्त्रीय नाव : Hibiscus Sabdariffa
कुळ : मालवेसी
उपयुक्त भाग : पाने, बिया

औषधी गुणधर्म

  • अंबाडीची पाने रेचक आहेत. फुलांचा रस, साखर व काळ्या मिरीबरोबर आम्लपित्तावर देतात.
  • बी कामोत्तेजक आहे. ते खरचटणे व दुखणे यावर बाहेरून लावण्यास चांगले.
  • अंबाडीचे बी भाजून भरडून खाल्याने पचनशक्ती सुधारते.

अंबाडीचे वरण

साहित्य

अंबाडीची पाने, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरा, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर.

कृती

  • एक पातेले घेऊन त्यात एक आवश्यकतेनुसार पाणी टाकूण तुर डाळ किंवा चन्याची डाळ शिजवावी.
  • एका पातेल्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल, गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण, जिरा, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो तळून घ्यावे.
  • त्यामध्ये भाजी टाकुन शिजु द्यावे. शिजविलेली डाळ ओतावी.
  • मध्यम आचेवर त्याला व्यवस्थित शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे.
  • अशा प्रकारे आपल्या आवडीची अंबाडीचे वरण तयार होईल.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, मराठी विश्वकोश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *