मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश

पुणे : कोरोना नियंत्रणासंदर्भात वारंवार सुचना देऊनही त्यांचे पालन होत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी लेखी आदेश काढून त्यांचे कठोर पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मनुष्यबळ व रूग्णांच्या व्यवस्थापनाबाबत सविस्तर सुचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी जिल्हा परिषदेतर्फे कोविड केअर सेंटर्स उभारण्यात आली. त्याचे नियोजन करण्यासाठी तज्ञ कर्मचारीही नेमण्यात आले. जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा कोरोना नियंत्रणात व्यस्त आहे. अनेकदा सुचना करूनही या कामात अनेक त्रृटी राहत असल्याने आता कर्मचाऱ्यांना लेखी आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ व्यवस्थापन कसे करावे, कर्मचा-यांचे प्रशिक्षण कसे घ्यावे, जिल्हातील रूग्णालयांची तसेच कोविड केअर केंद्रांच्या क्षमतेत वाढ कशी करावी, तेथील स्वच्छता, ऑक्सिजन पुरवठा, लेखा परिक्षण, बेड उपलब्धता या सोबतच रूग्णवाहीका उपलब्ध करण्याबाबत विस्तृत सुचना करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधितांवर उपचारात्मक उपाय योजनांमध्ये रूग्णालय व्यवस्थापन हा भाग महत्वाचा असल्याने या सुचना देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *