पुणे : नरवीर तानाजी वाडीतील (शिवाजीनगर) विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचे विश्वस्त व प्रतिष्ठित समाजमित्र संभाजीराव बाबुराव सातपुते ( वय ८१) यांचे बुधवारी (ता.९) मध्यरात्री हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्यामागे नितीन, अनिल सातपुते व मुली असा परिवार आहे.

संभाजीराव सातपुते यांचे यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबध होते. तसेच नेहरूच्या युवक काँग्रेसमध्ये काम केले होते. याशिवाय पुणे महापालिकेच्या आयटीआयमध्ये उच्च पदावर सेवा केली होती. त्यानंतर ते अथर्व सेल्स आणि सर्व्हिसेसचे ते सर्वेसर्वा होते. सातपुते हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत असत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *