पुणे : वेळेवर उपचार न मिळाल्याने पुण्यात पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. टी व्ही नाईन (TV9) वृत्तवाहीनीचे पुण्यातील बातमीदार पांडुरंग रायकर (वय ४२) यांचे कोरोनामुळे बुधवारी (ता.२) पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायकर यांची ‘अँटीजन टेस्ट’ निगेटिव्ह आली होती. त्यानंतर ते विश्रांतीसाठी गावी गेले असताना, पुन्हा थोडी तब्येत बिघडली. तेव्हा केलेली स्वब टेस्ट पोझिटिव्ह आली. त्यांना कोपरगावच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र दाखल करण्यासाठी त्यांना ४० हजार रुपये आगाऊ भरायला सांगितले. तेव्हा तिथे दाखल न होता पुण्यात जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथेही प्रकृती खालावत गेली. खासगी रूग्णालयातही व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध नव्हता. अखेर काल संध्याकाळी एका रूग्णालयात बेड मिळाला मात्र, तिकडे हलविण्यासाठी कार्डियाक अम्ब्युलन्स पहाटेपर्यंत मिळू शकली नाही. जेव्हा मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रायकर यांच्या मृत्यूने समाजाच्या सर्वच स्थरातून शोक व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *