• राज्यात १७ टक्के अधिक पाऊस
  • ऑगस्ट अखेरपर्यंत ९६१.६ मिलीमीटर पावसाची नोंद
  • हवामान विभागाची माहिती

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात (मॉन्सून) ऑगस्टअखेरपर्यंत राज्यात ९६१.६ मिलीमीटर (१७ टक्के अधिक) पावसाची नोंद झालीये. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आलंय. तर विदर्भात मात्र उणे ७ टक्के पावसाची नोंद होत पावसाने सरासरी गाठलीये. विदर्भातील अकोला व यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची, तर नगर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यात सरासरी ८२४.५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा चांगल्या पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात ३२०१.१ मिलिमीटर (२७ टक्के अधिक), मध्य महाराष्ट्रात ७७७.२ मिलिमीटर (३१ टक्के अधिक), मराठवाड्यात ६१६.८ मिलिमीटर (२२ टक्के अधिक), तर विदर्भात ७३०.८ मिलिमीटर (७ टक्के कमी) पावसाची नोंद झाली आहे.

ऑगस्टअखेरपर्यंत राज्यात विभागनिहाय पडलेला पाऊस

विभागसरासरीपडलेलाटक्केवारी
कोकण२५१६.८३२०१.१२७
मध्य महाराष्ट्र५९४.९७७७.२३१
मराठवाडा५०३.६६१६.८२२
विदर्भ७८४.३७३०.८उणे ७
सौजन्य : भारतीय हवामान विभाग

जून आणि जुलै महिन्यात मराठवाड्यात दमदार कोसळणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोटक्षेत्रात मुसळधार हजेरी लावली आहे. यामुळे राज्यातील प्रमुख धरणे ओसंडून वाहिली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. जवळपास महिनाभरापेक्षा अधिक काळ पावसाचा हंगाम असल्याने यंदा राज्यात समाधानकारक पाणीसाठा होणार आहे.

नगर, औरंगाबाद जिल्ह्यात दमदार

जिल्हानिहाय पडलेल्या पावसाची विचार करता, यंदा नगर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. नगर जिल्ह्यात सरीसरीपेक्षा ८० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा ७५ टक्के अधिक पावसाची, तर मुंबईमध्ये सरासरीपेक्षा ६८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील यवतमाळ, अकोला जिल्ह्यात सरीसरीच्या तुलनेत २६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

देशात ११० टक्के पाऊस

यंदाच्या मॉन्सून हंगामात आतापर्यंत देशातही समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. देशात ७८०.३ टक्के पावसाची (१० टक्के अधिक) नोंद झाली आहे. ऑगस्टअखेरपर्यंत देशात सरासरी ७१०.४ मिलिमीटर पाऊस पडतो. देशातील ३६ प्रमुख हवामान विभाग विचारात घेता, यंदा गुजरात, सिक्कीममध्ये सर्वाधिक, तर लडाख, जम्मु काश्मिर, मणिपूर, मिझोराम, नागालॅण्ड विभागात सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

ऑगस्टअखेरपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

जिल्हासरासरीपडलेलाटक्केवारी
मुंबई शहर१७१६.८२८८२.४६८
पालघर१९८६.६२३९७.४२१
रत्नागिरी२८०१.०३५४८.७१८
सिंधुदुर्ग२६१२.९३७४८.१४३
मुंबई उपनगर१८७८.७३१३७.७६७
ठाणे२०९५.६२५१०.१२०
नगर३०१.१५४२.६८०
धुळे४२५.६६४७.७५२
जळगाव५०९.०६३८.०२५
कोल्हापूर१५३४.३१८६८.५२२
नंदूरबार७१३.७७८०.७
नाशिक७५०.३८९६.६१९
पुणे७०५.११०१५.५४४
सांगली३७५.९४७४.२२६
सातारा७२६.१७७५.५
सोलापूर३०४.८४५४.५४९
औरंगाबाद४३१.३७५३.७७५
बीड३९४.१५८०.१४७
हिंगोली६४०.६६४८.२
जालना४६१.३६४४.७४०
लातूर५२५.१५७९.६१०
नांदेड७४६.९६२७.४उणे ३
उस्मानाबाद४१८.४४८०.११५
परभणी५९२.२५८९.२उणे १
अकोला५७५.७४२५.४उणे २६
अमरावती७०८.५५७१.५उणे १९
भंडारा९५९.५१०५१.७१०
बुलडाणा५३८.९५६७.१
चंद्रपूर९०३.५७९४.४उणे १२
गडचिरोली१०६५.४९९८.१उणे ६
गोंदिया१०२१.६१०४२.४
नागपूर७५२.०८५९.६१४
वर्धा७१९.३६७०.५उणे ७
वाशीम६४६.१७१८.६११
यवतमाळ६७४.३४९७.१उणे २६
सौजन्य : भारतीय हवामान विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *