पुणे : राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत होणारा पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधीचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये पुणे जिल्ह्याला ८५ कोटी ५१ लाख ६७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायती आणि पंचायत समितीला नुकताच हा निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यामध्ये १ हजार ४०८ ग्रामपंचायतींना एकूण ६८ कोटी ४१ लाख रूपये, १३ पंचायत समितींना एकूण ८ कोटी ५५ लाख रूपयांचा निधी वितरीत केला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी दिली.

आर्थिक वर्ष सुरू होण्याआधीच राज्यासह देशात करोनाचा शिरकाव झाला आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी बिघडू लागली. मागील पाच महिन्यांपासून देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अजूनही आर्थिक घडी व्यवस्थित बसली नाही. विशषेत: ग्रामीण भागात निधीअभावी अनेक विकासकामे रखडली आहेत. करोनामुळे यंदा सर्वच स्थानिक संस्थांचे आर्थिक बजेटही कमी झाले. अशा परिस्थितीत १५ व्या वित्त आयोगाचा आलेला निधी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींसाठी आशेचा किरण आहे. मंजुर निधीतून प्रत्येकी दहा टक्‍के निधी हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आहे. तर अन्य ८० टक्‍के निधी हा ग्रामपंचायत विभागातून सर्व ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात आला आहे.

पंधराव्या वित्त आयोगाकडून ग्रामपंचायतींसाठी आलेला निधी ग्रामपंचायत आणि पंचायत समितीला वितरीत केला आहे. या निधीतून गावामधील पेयजल पाणीपुरवठा आणि स्वच्छताविषयक कामे पूर्ण करावीत. त्यानंतर केलेल्या कामांची माहिती ऑनलाइन भरण्यात यावी. लोकसंख्येच्या ९० टक्के व क्षेत्रफळाच्या १० टक्के याप्रमाणे निधी वितरीत केला आहे.

– निर्मला पानसरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद

जिल्ह्यातील तालुकानिहाय वितरीत निधी

तालुकापंचायत समितीग्रामपंचायती
आंबेगाव५५ लाख ९५ हजार४ कोटी ४९ लाख ३८ हजार
बारामती७५ लाख ८७ हजार६ कोटी ६ लाख ७४ हजार
भोर४० लाख ६९ हजार३ कोटी २५ लाख ४५ हजार
दौंड७७ लाख ४८ हजार६ कोटी १९ लाख ६८ हजार
हवेली९९ लाख १२ हजार७ कोटी ९२ लाख ७० हजार
इंदापूर८७ लाख ८० हजार७ कोटी २ लाख ६ हजार
जुन्नर८८ लाख ४८ हजार७ कोटी ७ लाख ६४ हजार
खेड८४ लाख ६३ हजार६ कोटी ७६ लाख ८१ हजार
मावळ५९ लाख २२ हजार४ कोटी ७३ लाख ५९ हजार
मुळशी४० लाख ८२ हजार३ कोटी २६ लाख ४६ हजार
पुरंदर४७ लाख३ कोटी ७५ लाख ९० हजार
शिरूर८३ लाख ६० हजार६ कोटी ६८ लाख ५७ हजार
वेल्हा१४ लाख ५२ हजार१ कोटी १६ लाख ३४ हजार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!