पुणे श्रमिक पत्रकार संघ, ‘यशस्वी’ संस्थेच्या उपक्रम

पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघ व यशस्वी ॲकेडमी फॉर स्किल्सच्या वतीने पत्रकारांच्या कौशल्य विकासासाठी ‘वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स’चे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्सच्या समारोप करण्यात आला. ‘महावृत्त’ या न्यूज पोर्टलचा यावेळी शुभारंभ करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला बर्वे, ‘यशस्वी’ संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, पत्रकार संघाचे सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे, ‘यशस्वी’ संस्थेच्या प्रशिक्षिका वैशाली भुसारे यावेळी उपस्थित होते.

कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून नाविन्याचा ध्यास घेताना उपयुक्ततेला प्राधान्य द्यावे, असे मत डॉ. उज्वला बर्वे यांनी व्यक्त केले. तीस पत्रकारांनी प्रशिक्षण पूर्ण केले. उत्कृष्ट कामगिरी करत स्वतः वेबसाईट तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिक प्रदान करण्यात आले.

पुणे श्रमिक पत्रकार संघ, यशस्वी’ संस्थाच्या वतीने आयोजित वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्समध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुनील जगताप यांचा डॉ. सुनिता पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रसाद कुलकर्णी, डॉ. उज्वला बर्वे यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *