सुरण

शास्त्रीय नाव : Amorphophallus paeoniifolius
कुळ : अरेएसी
उपयुकत भाग : कंद , मूळ , पाने इ
कालावधी : बहुवार्षिक ( कंद )

औषधी गुणधर्म

  • सुरणात अ , ब , क ही जीवनसत्वे आहेत
  • कंद लोणच्याच्या स्वरुपात वायू नाशी समजला जातो.
  • आतडयांच्या रोगात सूरणाची भाजी गुणकारी आहे.
  • दमा, मूळव्याध, पोटदुखी,हत्तीरोग व रक्तविकारांवर भाजी उपयोगी आहे.

सुरण भाजी

साहित्य
एक किलो सुरण, अर्धा किलो चिचेचा पाला, अर्धा किलो पेरुचा पाला, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर, मसाला.
कृती

  • एक पातेले घेऊन त्यात पाणी घेऊन सुरण, चिचेचा पाला, पेरुचा पाला व मिठ घालुन उकळुन घ्यावे.
  • नंतर सुरणाचे तुकडे करुन घ्यावे.
  • एक पातेले घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल, गरम करावे
  • त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मिठ, हळद, व मसाला तळून घ्यावे.
  • नंतर त्यामध्ये सुरणाचे तुकडे टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे.
  • अशा प्रकारे आपल्या आवडीची सुरणाची भाजी तयार होईल.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *