भुईआवळी

शास्त्रीय नाव : Phyllanthus amarus

कुळ : Euphorbiaceae

आढळ : भुईआवळी सर्वत्र सर्व प्रकारच्या हवामानात आढळते.

औषधी गुणधर्म

  • कावीळ झाल्यास भुईआवळी वाटून दुधाबरोबर सकाळ संध्याकाळ देतात.
  • भुईआवळीने लघवीचे प्रमाण वाढते व दाह कमी होतो.
  • भुईआवळीचा वापर यकृतवृध्दी व प्लीहावृध्दी कमी करण्यास करतात.

भुईआवळीची भाजी

साहित्य
दोन वाट्या निवडून स्वच्छ केलेली भाजी, अर्धी वाटी तुर, मसुर किंवा मुंगडाळ, दाण्याचे कुट, हिरव्या मिरचीची पेस्ट, तेल, डाळीचे पीठ, ८-१० लसुन पाकळ्या, मोहरी, हिंग व गुळ इ.

कृती
• तेलाच्या फोडणीत लसुन परतावा.
• भाजी व डाळ कुकरमध्ये शिजवून घोटून त्यात डाळीचे पीठ लावावे.
• नंतर फोडणीत भाजी घालावी.
• मिरची पेस्ट, मीठ, दाणेकुट व थोडासा गुळ घालुन भाजी शिजवावी.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *