अळु

शास्त्रीय नाव : Colocasia esculenta

कुळ : Araceae

स्थानिक नावे : आरवी

अळू ही कंदवर्गीय वनस्पती आहे याच्या दोन जाती आहेत. एक हिरवट पांढरी व दुसरी काळी

औषधी गुणधर्म

  • अळूची काळी जात औषधात वापरतात.
  • पानांचे देठ मिठाबरोबर वाटून सुजलेल्या गाठी बसण्यास लेप करतात.
  • अळूचा रस जखमेवर चोळल्याने रक्त वाहणे बंद होऊन जखमही लवकर भरून येते.

अळूच्या पानांची भाजी

साहित्य
अळुची पाने, बेसन, तेल, जिरा, तिखट, मीठ, हळद, मिरची, बारीक चिरलेला कांदा, कोथींबीर
कृती

  • सर्वात प्रथम बेसन गव्हाच्या पिठाप्रमाणे मळुन घ्यावे.
    त्यामध्ये एक चमचा हळद व एक चमचा मिठ मिसळुन घ्यावे.
  • मळलेले बेसन पीठ अळूच्या पानावर पसरवुन त्वरित अळूची पाने गुंडाळून घ्यावे.
  • आळुच्या पानाच्या गुंडाळ्या वाफेवर शिजवून, कापून तेलामध्ये तळून घ्यावे.
  • नंतर भाजी करण्यासाठी एक पातेले घेऊन त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढे तेल, जिरा, तिखट,
    गरम मसाला, कांदा टाकून तळून घ्यावे नंतर त्यामध्ये आळूची तुकडे किंवा वड्या टाकुन शिजवुन
    घ्यावे. अशा प्रकारे अळुच्या पानांची भाजी तयार होईल.

अळूची पानांची वडी

साहित्य
अळूची पाने, बेसन, तेल, तिखट, मीठ, हळद.
कृती

  • सर्वात प्रथम बेसन गव्हाच्या पिठाप्रमाणे मळुन घ्यावे.
  • त्यामध्ये चवीनुसार तिखट, मिठ, हळद मिसळुन घ्यावे.
    मळलेले बेसन पीठ अळूच्या प्रत्येक पानावर पसरवुन त्वरित अळूची पाने एकावर एक ठेऊन
    गुंडाळून घ्यावे.
  • आळुच्या पानाच्या गुंडाळ्या वाफेवर शिजवून घ्यावे.
  • त्याचे बारीक तुकडे किवा वडया करुन तव्यावर तेलात टाकुन तळून घ्यावे.
  • अशा प्रकारे अळुच्या पानांची स्वादवडी तयार होईल.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *