ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या मिशन परिवर्तनअंतर्गत नीरचक्राचे वाटप

पुणे : जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सणसवाडी गावामधील आदिवासी कुटुंबांच्या डोक्यावरील ओझे कमी होणार आहे. स्वातंत्रदिनी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या मिशन परिवर्तनअंतर्गत दुर्गम भागातील नागरिकांना नीरचक्राचे वाटप करण्यात आले आहे.

वर्षानुवर्षे दुर्गम भागातील नागरिक आणि आदिवासींना मैलोनमैल पायपीट डोक्यावरून किंवा खांद्यावरून पाणी वाहून आणावे लागते. पाण्याने भरलेली जड भांड्यांचे ओझे दुरुन वाहून आणल्यामुळे अनेक माता-भगिणींना शरिराच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सणसवाडी गावातही पाऊस पडला तर पाणी वाहून जाते. पाणी जमिनीत मुरत नसल्याने विहीर, बोअरवेलमध्ये पाणीसाठा होत नाही. त्यामुळे महिलांना घरापासून दररोज २ ते ३ किमी अंतरावरून पाणी आणावे लागते. मिशन परिवर्तन-नीरचक्रमुळे या गावातील कुटुंबांना शारिरीक त्रासापासून स्वातंत्र्य मिळणार आहे.

ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन, रोस्ट्रम इंडिया सोशल ऑर्गनायझेशन आणि एक्सप्लिओ ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचे संस्थापक तन्वीर इनामदार, सहसंचालक तमन्ना इनामदार तसेच वैभव मोगरेकर, अमोल उंब्रजे, दिवाकर मोगरेकर, जावेद पठाण, बालाजी नाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मिशन परिवर्तन-नीरचक्र या उपक्रमांतर्गत आतपर्यंत २५० कुटंब आणि २२०० व्यक्तींना पाणी वाहतुकीसाठी मदत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!