मंदिरे सुरू करण्याच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा

पुणे : राज्यातील मंदिरे व देवस्थाने सुरू करण्याच्या मागणीसाठी “दार उघड उद्धवा दार उघड” अशी हाक देत विविध धार्मिक संस्था व संघटना, प्रमुख देवस्थानांच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी “घंटानाद आंदोलन” होणार आहे. या आंदोलनाला भाजपा पूर्ण पाठिंबा देत आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे. देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली. सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही. तीर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. त्याचाही राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *