श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा निर्णय

पुणे : गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, याकरीता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टसह अनेक मंडळांनी मंदिरामध्येच व ऑनलाईन गणेशोत्सव साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यातच विसर्जन व सांगता सोहळादेखील मुख्य मंदिरातच करण्यात येणार असल्याची माहिती माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी सुरु उत्सवात इतिहासात पहिल्यांदाच यंदा असा निर्णय घेण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीला सूर्यास्ताच्या वेळी मुख्य मंदिरात दगडूशेठच्या श्रीं चे विसर्जन होणार आहे.

अशोक गोडसे म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या या निर्णयाचे अनुकरण केवळ पुण्यातीलच नाही, तर महाराष्ट्रातील गणेश मंडळांनी करावे. गणेश मंडळांनी आपापल्या मंदिराच्या किंवा उत्सव मंडपाच्या परिसरात विसर्जनाची सोय करावी. तसेच समस्त पुणेकरांनी व गणेशभक्तांनी देखील घराबाहेर न पडता घरीच विसर्जन करावे. यामुळे कोरोनाशी सुरु असलेली लढाई लवकर संपविणे शक्य होईल. नागरिक घराबाहेर न पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास देखील मोठी मदत होणार आहे. श्रीं च्या विसर्जनासोबत कोरोनाचेही विसर्जन होण्यास हातभार लागेल.

घरबसल्या घ्या दगडूशेठ गणपतीचे दर्शन

https://www.youtube.com/watch?v=Z1OU-p3YD14

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *